नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची देशभरात चर्चा झाली होती. मात्र आता या योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेत मोठा बदल करत काही लाभार्थी महिलांसाठी अनुदानाची रक्कम १५०० रुपयांवरून ५०० रुपयांवर आणली आहे.
बदलाचे कारण काय?
सरकारच्या म्हणण्यानुसार, या महिलांना आधीच महिला शेतकरी सन्मान योजना अंतर्गत आर्थिक लाभ मिळत आहे. त्यामुळे दुहेरी लाभ टाळण्यासाठी लाडकी बहीण योजनेत या महिलांना आता केवळ ५०० रुपये दिले जातील. या निर्णयाचा परिणाम सुमारे ८ लाख महिलांवर होणार आहे.
विरोधकांचा आक्षेप
या निर्णयावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला सवाल करत म्हटलं, तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? तर शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावत म्हटलं, महिलांच्या मतांची किंमत लवकरच शून्यावर जाईल.
सरकारची भूमिका
सरकारचा युक्तिवाद आहे की, आर्थिक शिस्त राखण्यासाठी आणि तिजोरीवरील ताण कमी करण्यासाठी एकाच लाभार्थ्याला दोन योजनांचा लाभ देणे योग्य नाही. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाराजीचं वातावरण
निवडणुकीपूर्वी जाहीर झालेल्या लाडकी बहीण योजनेतील या बदलांमुळे अनेक महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. विरोधकांकडून देखील सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. आता लक्ष लागलं आहे की, सरकार आपला निर्णय कायम ठेवते की जनतेच्या दबावामुळे त्यामध्ये काही शिथिलता आणते.