नमस्कार मित्रांनो लाडकी बहिण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तिसरा हप्ता कधी मिळणार, याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. लवकरच लाडक्या बहिणींना तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. किती तारखेला पैसे बँक खात्यावर जमा होणार, आणि कोणत्या वेळेला मिळणार, याची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे. ही माहिती काळजीपूर्वक वाचा आणि इतर महिलांनाही शेअर करा, जेणेकरून त्या देखील लाडकी बहिण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख जाणून घेऊ शकतील.
लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता
लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबर रोजी बँक खात्यात जमा होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केली आहे. या योजनेत पहिल्या दोन हप्त्यांचे पैसे पात्र महिलांना मिळाले आहेत. जुलै महिन्यात अर्ज केलेल्या आणि मंजूर झालेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी 1500 रुपये प्रति महिना, एकूण 3000 रुपये मिळाले आहेत.
लाडकी बहीण योजना : पैसे जमा होण्याची तारीख फिक्स , या तारखेला होणार पैसे जमा Ladki Bahin Yojna
ज्या महिलांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अर्ज केले आहेत, त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. काही अपवादांमध्ये जुलै महिन्यातील अर्जदार महिलाही अजून हप्त्यांच्या रकमेपासून वंचित आहेत. या महिलांना आता या हप्त्यात मागील सर्व हप्त्यांची एकूण 4500 रुपये रक्कम मिळेल. आणि ज्यांना पहिल्या दोन हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत, त्यांना सप्टेंबर महिन्याचा तिसरा हप्ता 1500 रुपये दिला जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेचे ४५०० रुपये या महिलांना मिळणार नाही, यादी झाली जाहीर
तिसरा हप्ता केव्हा येणार?
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहिण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत माहिती दिली आहे. हप्ता 29 सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. त्यामुळे राज्यातील सर्व पात्र महिलांना याचा लाभ मिळणार आहे, आणि त्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. ही माहिती इतर महिलांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकेल.