महाराष्ट्र मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे आणि आतापर्यंत या योजनेचे दोन हप्ते वितरित करण्यात आलेले आहे तर तिसरा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 1500 रुपये म्हणजेच वर्षाला 18000 रुपयांचा लाभ दिला जातो आणि या योजनेमध्ये दीड कोटीपेक्षा जास्त महिला पात्र ठरलेल्या आहेत ज्यांना तिसरा हप्ता देण्यात येणार आहे. म्हणजेच ज्या महिलांना आतापर्यंत जुलै ते सप्टेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांना 4500 मिळतील तर ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये तीन हजार रुपयांचा हप्ता मिळालेला आहे त्यांना दीड हजार रुपये मिळतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना विषयी बीड मधील माजलगाव येथील सभेमध्ये 10 ऑक्टोबर रोजी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा एकत्रित हप्ता देण्याची घोषणा केलेली आहे ज्यामुळे महिलांना दिवाळीच्या आधीच एकत्रित पैसे मिळतील जेणेकरून महिलांची दिवाळी गोड होईल.
10 ऑक्टोबरला तीन हजार रुपये जमा होतील असे अजित पवार यांनी सांगितल्यामुळे लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये ट्रान्सफर केले जातील अशी चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात पहिल्याच दिवशी 512 कोटी रुपयांचा निधी वितरित केल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
जर तुम्ही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज सादर केलेला नसेल तर तुम्हाला त्यासाठी अंगणवाडी सेविकाकडे जाऊन अर्ज सादर करावा लागेल. यापूर्वी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकत होता परंतु आता लाडकी बहिण योजनेतील गैर व्यवहार टाळण्यासाठी शासनाच्या माध्यमातून ऑफलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत.