नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (PM Kusum Yojana) अंतर्गत शेतकऱ्यांना मोफत सोलर पंप देण्यात येतात. यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची जिल्ह्यानुसार यादी जाहीर करण्यात आली आहे. आज आपण या यादीत आपले नाव कसे शोधू शकता, हे जाणून घेणार आहोत.
सोलर पंप यादी पाहण्याची प्रक्रिया
1) http://pmkusum.mnre.gov.in या पोर्टलला भेट द्या.
2) पोर्टल उघडल्यानंतर होम पेजवर पब्लिक इन्फॉर्मेशन या पर्यायावर क्लिक करा आणि स्कीम बेनिफिशियरी लिस्ट निवडा.
3) त्यानंतर एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये आपले राज्य, जिल्हा, पंपाची क्षमता, आणि इन्स्टॉलेशन वर्ष निवडण्याचे पर्याय असतील.
4) आपले राज्य निवडा, त्यानंतर आपला जिल्हा आणि अर्ज केलेल्या पंपाची क्षमता (उदा. 03 एचपी, 05 एचपी) निवडा.
5) इन्स्टॉलेशन वर्ष निवडून गो वर क्लिक करा.
6) या प्रक्रियेनंतर तुमच्या अर्जाची स्थिती, मंजूरीबाबतची माहिती, आणि लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव, गाव, आणि सोलर पंप कोणत्या कंपनीचा आहे, यासंबंधित माहिती स्क्रीनवर दिसेल.
7) ही यादी तुम्ही पीडीएफ स्वरूपात आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह करू शकता.
या प्रक्रियेद्वारे तुम्ही सहजपणे आपले नाव यादीत शोधू शकता आणि योजनेचे लाभ घेऊ शकता.