महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने 34 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफी योजनेला मंजुरी दिलेली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक ओझे कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या या लेखात आपण या महत्त्वाच्या निर्णया बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
व्यापक लाभार्थी :-
राज्यातील एकूण 40 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये थकबाकीदार शेतकरी, नियमित कर्ज भरणारे शेतकरी आणि मध्यम मुदतीच्या कर्जाचे लाभार्थी अशा शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. या मोठ्या दृष्टिकोनामुळे राज्यातील बहुतांश शेतकरी कुटुंबांना या योजनेचा चांगला फायदा होणार आहे.
आर्थिक स्थिरता :-
दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सरसकट माफी केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा होणार आहे. याचा अर्थ त्यांच्यावरील कर्जाचे ओझे हे पूर्णतः दूर होणार आहे. हे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यास अधिक मदत करेल आणि त्यांना पुन्हा नव्याने शेती व्यवसाय सुरू करण्याची यातून सुवर्णसंधी सुद्धा मिळेल.
कर्ज चक्रातून मुक्तता :-
राज्यातील अनेक शेतकरी हे कर्जाच्या चक्रात अडकले आहेत. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेण्याची परिस्थिती राज्यातील शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झाली आहे. या योजनेमुळे त्यांना या दृष्टचक्रातून बाहेर पडण्याची संधी मिळेल. कर्जमुक्त झाल्यावर ते नव्या जोमाने शेतीकडे वळू शकतील.
महाराष्ट्र सरकारची ही कर्जमाफी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच दिलासादायक आहे. 34 हजार कोटी रुपयांची ही योजना राज्यातील शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचा यातून प्रयत्न आहे. मात्र कर्जमाफी ही कायम स्वरूपाची उपाययोजना नाही. शेतकऱ्यांना कर्जमुक्त ठेवण्यासाठी दीर्घकालीन धोरणांची खूप गरज आहे. शेतीमालाला योग्य भाव, सिंचन सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान, पीक विमा यांसारख्या उपायांवर भर देणे गरजेचे आहे.
तर मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली , पोस्ट आवडली असल्यास आजच शेअर करा.