महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने ज्योतिराव फुले कर्जमाफी योजने मार्फत पाचव्या टप्प्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना खप मोठा दिलासा मिळणार आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्जमाफीचा लाभ मिळणार आहेत.
ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढणे व त्यांना नव्या जोमाने शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे एवढा आहे. विशेष म्हणजे, नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कर्जमाफी योजनेची वैशिष्ट्ये आणि लाभ
1) प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्जमाफीचे अनुदान दिले जाणार
2) थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार
3) सरळ आणि पारदर्शक प्रक्रिया
4) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
5) विशेष तपासणी यंत्रणा
लाभार्थी निवड कशी होते ?
सरकारने या योजनेसाठी काही ठराविक निकष व नियम ठरविले आहेत
1) कर्जदार शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
2) शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असावी
3) त्याने बँकेतून कर्ज घेतलेले असावे
4) नियमित कर्ज परतफेडीचा त्याचा इतिहास असावा
अर्ज प्रक्रिया
शेतकऱ्यांनी आपले नाव यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील पद्धती वापरण्यात यावी –
1) संबंधित बँक मध्ये जाऊन चौकशी करणे
2) ऑनलाइन पोर्टलवर नावाची तपासणी करणे
3) तलाठी कार्यालयामध्ये संपर्क साधणे
4) ग्रामसेवकांकडून माहिती घेणे
महाराष्ट्र राज्य सरकारची ही कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जातून मुक्ती मिळणार आहे , त्यांना नव्या जोमाने शेती करण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा मिळणार आहे.