मंडळी कांद्याच्या साठवणुकीसाठी योग्य सुविधा न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब होतो. कांद्याची टिकवण क्षमता वाढविण्यासाठी आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी, राज्य सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत कांदाचाळ उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे. ही योजना कशी वापरावी, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता निकष, अटी आणि अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.
कांदाचाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष
1) शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन असावी आणि 7/12 उताऱ्यावर कांदा पिकांची नोंद असावी.
2) शेतकऱ्यांकडे कांदा पिक असावा.
3) कांदाचाळ योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांसोबतच शेतकऱ्यांच्या गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट आणि शेतकऱ्यांचे उत्पादक संघ देखील घेऊ शकतात.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- 7/12 उतारा
- 8 अ
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- जातीचे प्रमाणपत्र (अनु. जाती/अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
- यापूर्वी कांदाचाळीचा लाभ घेतला नसल्याचे हमीपत्र अर्ज कसा करावा
1) शेतकऱ्यांनी हॉर्टनेट http://www.hortnet.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज नोंदवावा.
2) अर्ज नोंदवल्यानंतर, शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात वरील कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.
3)तालुका कृषी अधिकारी कडून पूर्व संमती मिळाल्यानंतर कांदाचाळ उभारणीचे काम सुरू करावे.
4) पूर्वसंमती मिळाल्यापासून दोन महिन्यांच्या आत कांदाचाळ उभारणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
या प्रकारे शेतकऱ्यांना कांदाचाळ उभारणीसाठी अनुदान मिळवून, कांद्याची साठवणूक आणि गुणवत्ता सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण मदत मिळू शकते.