नमस्कार जिओसह सर्व खासगी दूरसंचार कंपन्यांनी गेल्या जुलै महिन्यात आपल्या मोबाईल दरात 22% वाढ केली होती, ज्यामुळे मोबाईल रिचार्ज प्लॅन्स महाग झाले आहेत. जिओच्या कडे सध्या विविध व्हॅलिडिटीसह अनेक रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत, ज्या युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट डेटा आणि एसएमएस सेवा देतात. विशेषता 84 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत 28 दिवसांच्या प्लॅनपेक्षा कमी असल्यामुळे बहुतेक युजर्स 3 महिन्यांचा प्लॅन निवडतात.
जर तुम्ही जिओ युजर असाल आणि 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर 859 रुपयांचा प्लॅन उत्तम पर्याय ठरू शकतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंग मिळतो.
याशिवाय दररोज 2GB हाय स्पीड डेटा आणि 100 फ्री एसएमएस देखील दिले जातात, ज्यामुळे एकूण 168GB डेटा उपलब्ध होतो. हा प्लॅन 5G स्मार्टफोन वापरणाऱ्या युजर्ससाठी आणखी फायदेशीर ठरतो, कारण त्यांना जिओच्या True 5G नेटवर्कवर अनलिमिटेड डेटा वापरण्याची सुविधा मिळते. याशिवाय जिओ TV, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउड एप्ससाठी फ्री एक्सेस देखील मिळतो.
दुसरीकडे जिओचा 479 रुपयांचा 84 दिवसांचा व्हॅल्यू प्लॅन देखील आहे. या प्लॅनमध्ये देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, 1,000 फ्री एसएमएस आणि एकूण 6GB हाय स्पीड डेटा मिळतो. हा प्लॅन त्या युजर्ससाठी योग्य आहे जे फक्त कॉलिंगसाठी मोबाईल वापरतात.