मित्रांनो जर तुम्ही Reliance Jio चे युजर्स असाल, तर या बातमीला नक्कीच लक्ष द्या. आज आम्ही तुम्हाला परवडणाऱ्या Reliance Jio च्या रिचार्ज प्लॅनविषयी माहिती देणार आहोत, जे 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. हे प्लॅन तुम्हाला एक उत्तम पर्याय देऊ शकतात, खासकरून जेव्हा तुम्हाला कमी किमतीत रिचार्ज करून नंबर चालू ठेवायचा असतो.
वर्तमान टेलिकॉम मार्केटमध्ये प्रीपेड रिचार्ज प्लॅन महाग झाले आहेत, ज्यामुळे योग्य प्लॅन निवडणे खूप कठीण होऊ शकते. त्यामुळे, तुम्ही Reliance Jio चा वापर करत असाल आणि सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही सर्वोत्तम पर्याय घेऊन आलो आहोत.
200 रुपयांपेक्षा कमी रिचार्ज प्लॅन
जर तुम्हाला 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत रिचार्ज करायचं असेल आणि तुमचा Reliance Jio नंबर चालू ठेवायचा असेल, तर Jio कंपनी तुम्हाला एक परवडणारा प्लॅन देत आहे. या प्लॅनमध्ये डेली डेटा नाही, पण संपूर्ण वैधता कालावधीसाठी मर्यादित डेटा दिला जातो. जर तुम्हाला सेकंडरी नंबर चालू ठेवायचा असेल, तर हा प्लॅन उत्तम पर्याय ठरू शकतो.
Reliance Jio चा 189 रुपयांचा प्लॅन
Reliance Jio चा 189 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि संपूर्ण कालावधीसाठी 2 GB डेटा मिळतो. तसेच, तुम्हाला 28 दिवसांमध्ये 300 SMS पाठवता येतात. याशिवाय, जिओ टीव्ही आणि जिओ AI क्लाऊडचा एक्सेस देखील मिळतो. या प्लॅनमध्ये डेली 5G डेटा आणि अनलिमिटेड डेटा नाही, पण तुम्ही डेटा संपल्यानंतर बूस्टर प्लॅन घेतल्यास अधिक डेटा मिळवू शकता.
Reliance Jio चा 579 रुपयांचा प्लॅन
Jio च्या 579 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा मिळतो आणि याची वैधता 56 दिवसांची असते. यामध्ये फ्री कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील दिले जातात. याशिवाय जिओ एप्सचा एक्सेस मिळतो. या प्लॅनचा दर दररोज फक्त 10 रुपये आहे, जो खूपच परवडणारा ठरतो.
याव्यतिरिक्त, जिओच्या रिचार्ज प्लॅनमुळे तुमचं नंबर कायम ठेवण्याची सोय सहज होईल, जरी तुम्हाला हाय स्पीड डेटा किंवा 5G सेवा न मिळत असली तरी.