नमस्कार मंडळी सध्या सणासुदीचा काळ चालू असून, दसऱ्यानंतर लगेचच दिवाळीही तोंडावर आली आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या आर्थिक बजेटमध्ये ताण येण्याची शक्यता वाढते. त्यातच औषधांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने नागरिकांवरील आर्थिक भार आणखीनच वाढणार आहे. नुकताच राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (NPPA) 11 औषधांच्या फॉर्म्युलेशन्सच्या किमती 50% पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे.
औषध निर्मितीच्या खर्चात वाढ झाल्यामुळे, औषध उत्पादकांनी या किमती वाढवण्याची मागणी केली होती. तथापि, अद्याप API (अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडिएंट्स) ने ही किमती वाढवण्यास अंतिम मंजुरी दिलेली नाही. API च्या मते, औषधांची उपलब्धता सुनिश्चित करणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने NPPA सोबत नुकतीच एक बैठक घेतली, ज्यात औषधांच्या किमती वाढवण्याचा निर्णय झाला. 2019 आणि 2021 मध्येही औषधांच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या, आणि आता पुन्हा 2024 मध्ये औषधांच्या किमती जवळपास 50% ने वाढल्या आहेत.
या किमती वाढलेल्या औषधांमध्ये दमा, टीबी, थॅलेसेमिया आणि मानसिक आरोग्य उपचारांशी संबंधित औषधांचा समावेश आहे. साल्बुटामोल 2mg आणि 4mg गोळ्या तसेच रेस्पिरेटर सोल्युशन 5mg यांचा समावेश आहे. याशिवाय कॅन्सर विरोधी औषधे, निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी आणि इतर महत्वाची औषधेही या यादीत आहेत.
औषधांच्या किमती वाढवल्याने सामान्य नागरिकांच्या उपचारांचा खर्च वाढणार आहे, ज्यामुळे त्यांच्या आरोग्य सेवांवर आर्थिक ताण येऊ शकतो. औषधांच्या कमाल किमती निश्चित करण्यात आलेल्या असल्या तरी नागरिकांना आता त्याच औषधांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत, ज्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो.