नमस्कार मित्रानो आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार असल्याची माहिती समोर आली आहे, चला तर जाणून घेऊया अधिक माहिती.
सध्या पश्चिमी चक्रावताच्या प्रभावामुळे हिमाचल प्रदेश उत्तराखंड, दिल्ली अशा उत्तरेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस सुरू आहे . तर दक्षिणेकडील राज्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .
महाराष्ट्रात तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून आता येत्या चार दिवसात कोकणपट्ट्यासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अवकाळी पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत.आज संपूर्ण महाराष्ट्रात सामान्य तापमान होऊन अधिक तापमानाची नोंद झाली .राज्यभरात आता प्रचंड रखरख वाढली आहे .उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत .
लातूर 41.0℃, सांगली 41.0℃, उस्मानाबाद 41.5℃, वर्धा 40.5℃, पुणे 40.6℃, सातारा 40.6℃, नाशिक 39.9℃, गडचिरोली 39.0℃, सिंधुदुर्ग 39.0℃, नागपूर 39.4℃, ठाणे 37.0℃, पालघर 36.4℃, रायगड 36.2℃, गोंदिया 36.0℃, भंडारा 36.0℃, मुंबई उपनगर 34.4℃, मुंबई शहर 34.2℃, रत्नागिरी 34.2℃
पावसाचे इशारा कुठे व कधी ?
3 मे – नाशिक,अमरावती, यवतमाळ ,नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया ,गडचिरोली अवकाळी पावसाचे येलो अलर्ट
पुणे, अहिल्यानगर ,धुळे, नंदुरबार ,नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांना हलक्या पावसाचा इशारा दिला आहे .
4 मे – नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार,अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया
गडचिरोली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा येलो अलर्ट जाहीर
मुंबई, ठाणे ,रायगड ,पुणे ,सातारा, बीड ,जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हांमध्ये पावसाची शक्यता आहे .
5 मे – संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता .मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा विदर्भ सर्व विभागांमध्ये बहुतांश ठिकाणी अलर्ट .
6 मे : सातारा पुणे ठाणे पालघर नाशिक अहिल्यानगर बीड जालना छत्रपती संभाजी नगर जळगाव धुळे नंदुरबार यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट .
कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात उर्वरित ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज
7 मे : संपूर्ण कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र व बहुतांश मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय .यात विदर्भाचा समावेश नाही.