मंडळी गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा दर ४६ रुपयांनी वाढून ८६,३४६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे, तर चांदी ९०५ रुपयांनी वाढून ९६,८९८ रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.
२२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट दर ४२ रुपयांनी वाढून ७९,०९३ रुपये झाला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे दर जाहीर करते, मात्र यात जीएसटी समाविष्ट नाही. स्थानिक बाजारपेठेत हे दर १००० ते २००० रुपयांनी वेगळे असू शकतात. IBJA हे दर दिवसातून दोन वेळा – दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ५ वाजता जाहीर करते.
२३ कॅरेट सोन्याचा दर ४६ रुपयांनी वाढून ८६,००० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. १८ कॅरेट सोनं ३५ रुपयांनी वाढून ६६,९६० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे, तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ४८ रुपयांनी वाढून ५०,५१२ रुपये झाला आहे.
गेल्या चार दिवसांत सोनं १२९० रुपयांनी आणि चांदी ३,४१८ रुपयांनी महागली आहे. १ आणि २ मार्चला शनिवार आणि रविवार असल्याने IBJA दर जाहीर करत नाही. २८ फेब्रुवारी रोजी सोन्याचा दर ८५,०५६ रुपये आणि चांदीचा दर ९३,४८० रुपये होता. २०२५ मध्ये आतापर्यंत सोन्याचा दर १०,६०६ रुपयांनी आणि चांदीचा दर १०,८८१ रुपयांनी वाढला आहे.
MCX व आंतरराष्ट्रीय बाजारातही किंमतींमध्ये चढ-उतार दिसून येत आहे. आज सकाळी MCX वर सोन्याचा दर ८६,०७७ रुपयांवर उघडला आणि तो ८६,०८९ रुपयांवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर २,९२२ डॉलर प्रति औंस तर कॉमेक्स सोन्याचा दर २,९३१ डॉलर प्रति ट्रॉय औंस होता.
सोन्या-चांदीच्या वाढत्या दरांमुळे गुंतवणूकदारांसाठी ही महत्त्वाची वेळ आहे. भविष्यात दर आणखी वाढू शकतात, त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.