मंडळी केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे, ज्यामुळे नागरिकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकारने सोन्या आणि चांदीच्या आयातीवरील शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्य बदलांमध्ये सोने आणि चांदीवरील आयात शुल्क २५% वरून २०% केले आहे. तसेच, प्लॅटिनमवरील शुल्क २५% वरून थेट ५% केले आहे. हे नवे दर २ फेब्रुवारी २०२५ पासून लागू झाले आहेत. या निर्णयामुळे आयात केलेले दागिने स्वस्त होणार आहेत. इटली, फ्रान्स, स्वित्झर्लंड सारख्या देशांमधून आयात होणाऱ्या बँडेड दागिन्यांच्या किमती कमी होणार आहेत. टिफनी, बल्गारी, कर्थीयर यासारख्या आंतरराष्ट्रीय ब्रॅंडचे दागिने भारतीय बाजारात स्वस्त होतील.
भारतीय लक्झरी ज्वेलरी मार्केटला या निर्णयामुळे चांगली चालना मिळणार आहे. कामा ज्वेलरीचे एमडी कॉलिन चहा यांच्या मते, या निर्णयामुळे भारतीय बाजारपेठेत लक्झरी दागिन्यांची विक्री वाढेल आणि ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध होतील.
या निर्णयामुळे सोन्या आणि प्लॅटिनियमच्या मिश्र धातूंना स्वतंत्र हार्मोनाइज्ड सिस्टीम (HS) कोड मिळणार आहे. त्यामुळे आयात प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल आणि व्यापाऱ्यांना गती मिळेल. एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान सोन्याच्या दागिन्यांची आयात ८७.४% ने वाढली होती. आयात शुल्क कमी झाल्यानंतर या मागणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सोन्या आणि चांदीच्या दागिन्यांच्या किमतींमध्ये घट होईल, आणि ब्रॅंडेड ज्वेलर उद्योगाला मोठी चालना मिळेल. सोनं (१० ग्रॅम) ₹८३,३६० आणि चांदी (१ किलो) ₹९४,१५० आहे, ज्यात ₹१,१५० ची वाढ झालेली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या दरात ब्रँडेड दागिने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे, आणि भारतीय लक्झरी ज्वेलरी मार्केटमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे.