मंडळी आज सोन्या-चांदीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून गगनाला भिडलेले सोन्याचे दर आज पुन्हा कमी झाले आहेत. सोन्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या चढ-उतारांमुळे लग्नसराईच्या दिवसांत ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
वायदे बाजारात सोन्याच्या दरात आज 120 रुपयांची घसरण झाली असून, 22 कॅरेट सोन्याचा दर 70,930 रुपयांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाल्याने सोन्याचे दर कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं सध्या 2627 डॉलरच्या आसपास ट्रेड करत आहे.
चांदीच्या दरातही मोठी घट झाली असून, 599 रुपयांनी कमी होऊन ती 87,081 रुपये प्रतिकिलोवर ट्रेड करत आहे. ही घसरण ग्राहकांसाठी संधी असली तरी बाजारातील अस्थिरतेमुळे सोनं किंवा चांदी खरेदी करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
आज 22 कॅरेट सोन्याचा दर 70,930 रुपये प्रति तोळा, 24 कॅरेट सोन्याचा दर 77,350 रुपये प्रति तोळा, आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 58,010 रुपये प्रति तोळा आहे. याशिवाय, 1 ग्रॅम सोन्यासाठी 22 कॅरेट 7,093 रुपये, 24 कॅरेट 7,735 रुपये, आणि 18 कॅरेट 5,801 रुपये दर आहे.
मुंबई व पुण्यातही सोन्याचे दर याच पातळीवर आहेत. 22 कॅरेट सोनं 70,930 रुपये, 24 कॅरेट 77,350 रुपये, आणि 18 कॅरेट 58,010 रुपये प्रति तोळा इतके दर आहेत.
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये झालेली घट ही लग्नसराईच्या ग्राहकांसाठी सोयीची असली तरी गुंतवणुकीसाठी योग्य वेळ ठरतो का, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. दरांची खात्री करण्यासाठी जवळच्या बाजाराचा सल्ला घ्या.