मंडळी नवीन वर्ष सुरू होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला ग्राहकांसाठी एक सुखद बातमी आहे. सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. वायदे बाजारात सोने 400 रुपयांनी घसरले आहे, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीचे दर कमी झाले आहेत. आज सकाळच्या सत्रात सोने 400 रुपयांनी घसरले असून, हे दर ग्राहकांसाठी एक चांगली संधी बनले आहे. चला, आज सोन्याचे नवीन दर काय आहेत ते पाहूया.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे मागील काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार होत होते. काही दिवसांच्या सातत्याने वाढीनंतर, आज सोन्याचे दर कमी होणे हे खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक ठरले आहे. आज चांदीच्या दरात 233 रुपयांची घट झाली आहे. चांदीचा नवीन दर 87,298 रुपये प्रति किलो झाला आहे. तसेच 24 कॅरेट सोन्याचा दर 440 रुपयांनी कमी होऊन 77,560 रुपये प्रति दहा ग्राम झाला आहे.
तसेच 22 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 400 रुपयांची घसरण झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 71,100 रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 320 रुपयांची घट झाली असून, 18 कॅरेट सोन्याचा नवीन दर 58,180 रुपये प्रति दहा ग्राम आहे.
चांदीच्या दरात 233 रुपयांची घट झाल्याने आज एक किलो चांदीचा दर 87,298 रुपये झाला आहे.
आम्ही दिलेले सोन्याचे दर इंटरनेटवरील माहितीवर आधारित आहेत. यामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्ज समाविष्ट नाहीत. स्थानिक ज्वेलर्सच्या दरांमध्ये थोडा फरक होऊ शकतो. त्यामुळे अचूक दर जाणून घेण्यासाठी स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधावा.