मंडळी गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किंमती सतत वाढत होत्या, ज्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली होती. विशेषतः लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींनी 3,000 रुपयांपर्यंत उंची गाठली होती, तर चांदीचे दर 1,000 रुपयांनी वधारले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे – सोने आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली आहे.
सोन्याच्या किंमतीत लहानशी घसरण
गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोन्याचा दर आता 75,550 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 82,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मागील दोन आठवड्यांच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीत 170 रुपयांची घट झाली आहे.
चांदीचे दर कमी
चांदीच्या किंमतीतही महत्त्वपूर्ण घट दिसून आली आहे. 27 जानेवारी रोजी चांदीचा दर 1,000 रुपयांनी कमी होऊन सध्या 96,500 रुपये प्रति किलो आहे.
ज्वेलर्स असोसिएशननुसार, वेगवेगळ्या कॅरेटच्या सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत.
- 24 कॅरेट सोने: 80,397 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 23 कॅरेट सोने: 80,075 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 22 कॅरेट सोने: 73,644 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 18 कॅरेट सोने: 60,298 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 14 कॅरेट सोने: 47,032 रुपये प्रति 10 ग्रॅम
- चांदीचा दर: 90,274 रुपये प्रति किलो
दर घरबसल्या कसे तपासाल?
ग्राहक इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर ताज्या दरांची माहिती घेऊ शकतात. तसेच 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटच्या सोन्याचे आणि चांदीचे दर जाणून घेता येतात.
सध्याच्या किंमतींमुळे सोन्याच्या खरेदीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे, परंतु भविष्यातील किंमतींवर बाजारातील स्थितीचा प्रभाव राहणार आहे.