नमस्कार मित्रांनो भारतात सोन्याला एक विशेष स्थान आहे, विशेषत: सणासुदीच्या काळात याची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. गणेशोत्सव नुकताच संपला आणि या काळात सोन्याचे दर गगनाला भिडले होते. पण सध्या सोन्याच्या दरात किंचित घट पाहायला मिळत आहे, ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किंमतीत थोडी घसरण दिसून आली आहे. चला आजच्या सोन्याच्या भावाची सविस्तर माहिती घेऊयात.
सध्याचे सोन्याचे दर
Goodreturns वेबसाइटनुसार काल 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 74,890 रुपये होता. आज यामध्ये 160 रुपयांची घट होऊन तो 74,730 रुपये झाला आहे. तसेच, 22 कॅरेट सोन्याचा भाव 150 रुपयांनी कमी होऊन 68,500 रुपये झाला आहे. याचबरोबर, एक किलो चांदीच्या दरात हजार रुपयांची घट होऊन किंमत 91,000 रुपये झाली आहे. भारतातील सोन्याच्या किंमती उत्पादन शुल्क, राज्य कर, आणि मेकिंग शुल्कामुळे बदलत राहतात.
पहा पूर्ण शहरांची यादी
सोन्याच्या मागणीचा वाढता कल
मित्रानो आगामी काळात सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सध्या सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50% ने वाढली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असल्यामुळे यावेळी दागिन्यांची खरेदी जोरात सुरू आहे. तज्ञांच्या मते, सणासुदीच्या काळात सोन्याचा दर 76,000 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो.
या योजनेद्वारे कुटुंबांना मिळेल 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य लाभ, असे बनवा ऑनलाईन कार्ड
तुमच्या शहरातील सोन्याचे दर
मुंबई
22 कॅरेट (10 ग्रॅम): ₹68,520
24 कॅरेट (10 ग्रॅम): ₹74,690
18 कॅरेट (10 ग्रॅम): ₹56,050
पुणे
22 कॅरेट (10 ग्रॅम): ₹68,480
24 कॅरेट (10 ग्रॅम): ₹74,720
18 कॅरेट (10 ग्रॅम): ₹56,050
नागपूर
22 कॅरेट (10 ग्रॅम): ₹68,500
24 कॅरेट (10 ग्रॅम): ₹74,730
18 कॅरेट (10 ग्रॅम): ₹56,050
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा इशारा , या जिल्ह्यांना पावसाने धो-धो धुऊन काढणार
नाशिक
22 कॅरेट (10 ग्रॅम): ₹68,530
24 कॅरेट (10 ग्रॅम): ₹74,760
18 कॅरेट (10 ग्रॅम): ₹56,100
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक
मित्रानो सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध असून त्यात 99.99% शुद्धता असते. यामध्ये इतर कोणतीही धातू मिसळलेली नसते. 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.6% शुद्ध सोने असते आणि उर्वरित भागात चांदी, तांबे, निकेल, किंवा जस्त यासारख्या मिश्रधातूंचा समावेश असतो. मित्रानो 22 कॅरेट सोने हे दागिने बनवण्यासाठी उत्तम मानले जाते कारण ते टिकाऊ आणि मजबूत असते, तर 24 कॅरेट सोने अधिक शुद्ध असल्यामुळे सामान्यता नाण्यांमध्ये किंवा इतर गुंतवणूक साधनांमध्ये वापरले जाते.