मंडळी लग्नसराईच्या हंगामात सोन्याचे वाढलेले दर हे चिंताजनक आहेत. सोन्याच्या या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्य व्यक्तींना ते खरेदी करणे अधिकच अवघड होत आहे. चला आजच्या तारखेत सोन्याचे दर (Gold Rate Today) काय आहेत ते पाहूया. २२ आणि २४ कॅरेट सोन्याच्या दरात आज वाढ झाली की घट, याची माहिती येथे दिली आहे.
२४ कॅरेट सोने (Gold Rate Today)
आज २४ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव ८,७८७ रुपये आहे. हाच दर काल ८,७७७ रुपये होता, म्हणजेच आज एक ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात दहा रुपयांची वाढ झाली आहे. तर दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव ८७,८७० रुपये आहे. हाच दर काल ८७,७७० रुपये होता, म्हणजेच आज दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात शंभर रुपयांची वाढ झाली आहे.
२२ कॅरेट सोने (Gold Rate Today)
दुसरीकडे, २२ कॅरेट सोने म्हणजेच ज्यामध्ये आपण दागिने घडवतो, अशा सोन्याच्या दराबद्दल सांगायचे झाल्यास, आज २२ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा दर ८,०५५ रुपये आहे. हाच दर काल ८,०४५ रुपये होता, म्हणजेच आज एक ग्रॅम २२ कॅरेट सोन्याच्या दरात दहा रुपयांची वाढ झाली आहे. तर २२ कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा आजचा भाव ८०,५५० रुपये आहे. हाच भाव काल ८०,४५० रुपये होता, म्हणजेच आज २२ कॅरेट दहा ग्रॅम सोन्याच्या दरात शंभर रुपयांची वाढ झाली आहे.
चांदीचे दर
तर आजच्या तारखेच्या २४ फेब्रुवारी रोजी चांदीची किंमत प्रति किलोग्राम १,०४,००० रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. मागील काही दिवसांपासून चांदीचा दर ९०,००० रुपयांच्या आसपास होता, परंतु आज आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी चांदीचा दर १,०४,००० रुपये प्रति किलोग्राम वर जाऊन पोहोचला आहे.
सोने आणि चांदीच्या दरातील ही वाढ ग्राहकांसाठी चिंतेचा विषय आहे, विशेषता लग्नाच्या हंगामात या दरांमुळे खरेदी करणे अधिकच कठीण होत आहे.