नमस्कार मंडळी सोन्याच्या दरात सुरू असलेल्या वाढीला सध्या थोडासा ब्रेक मिळाल्याचं दिसत आहे. आज सोन्याचे दर किंचित घसरले आहेत, ज्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आज सलग तिसऱ्या दिवशीही २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात फार मोठा बदल नाही, परंतु किंमत काहीशी कमी झाली आहे. मुंबई आणि कोलकाता येथे २२ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम ७०,००० रुपये दराने उपलब्ध आहे.
दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, लखनौ, आणि जयपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे ७७,५०० रुपये आहे. तसेच चांदीच्या दरातही घट झाली असून, आता ती प्रति किलो ९५,९०० रुपये दराने उपलब्ध आहे, जी कालच्या तुलनेत १,००० रुपयांनी कमी आहे.
सणासुदीच्या काळात सोन्याच्या मागणीत वाढ होत असली तरी किमतीतील ही घसरण गुंतवणूकदारांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते दिवाळीपर्यंत चांदीची किंमत एक लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
मुंबई आणि कोलकाता येथे २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ७७,४४० रुपये दराने तर २२ कॅरेट सोनं प्रति तोळा ७०,९९० रुपये दराने विकले जात आहे. काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सतत वाढत होत्या, पन गेल्या दोन दिवसांत त्याला ब्रेक मिळाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
जागतिक बाजारातील मंदी जिओ-पॉलिटिकल घडामोडी, तसेच इस्रायल-इराण संघर्ष यामुळे सोन्याच्या किमतींवर परिणाम होत असून, त्यात वाढ होताना दिसत आहे. मात्र एमसीएक्सवर सोन्याचे दर ४०० रुपयांनी कमी होऊन ७८,३०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीच्या दरात घट झाल्यानंतर नफा बुकिंगमुळे चांदी ९४,००० रुपये प्रति किलोवर स्थिर राहिली आहे. ९९.५ टक्के शुद्धतेचे सोने देखील विक्रमी पातळीवरून ४०० रुपयांनी घसरून ७७,९०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे.