मंडळी दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून आज धनत्रयोदशीचा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी नवीन भांडी खरेदी करणे आणि सोने-चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. या पार्श्वभूमीवर, सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे: धनत्रयोदशीच्या महत्त्वाच्या मुहूर्तावर, दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घट झालेली आहे.
जळगाव सुवर्णपेठेत आज सोने दरात ४५० रुपयांची कमी झाली आहे. यामुळे २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,५६० रुपये प्रति तोळा आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७९,१५० रुपये प्रति तोळा इतका आहे. जीएसटीसह या सोन्याचे कुल मूल्य ८१,५२५ रुपये आहे. त्याचबरोबर, चांदीच्या किमतीत एक हजार ६०० रुपयांची घट झाली आहे, ज्यामुळे ती ९६,७०० रुपयांवर आली आहे.
गेल्या आठवड्यातील शेवटच्या दोन दिवसांत सोने दरात ७०० रुपयांची वाढ झाली होती, ज्यामुळे तो ७९,६०० रुपयांवर पोहोचला होता. मात्र सोमवारी ४५० रुपयांची घट झाल्यामुळे तो ७९,१५० रुपये प्रति तोळा झाला. चांदीच्या किमतीतही ३०० रुपयांची वाढ होऊन ती ९८,३०० रुपये प्रति किलोवर पोहोचली होती, पण सोमवारी एक हजार ६०० रुपयांची कमी झाली आणि ती ९६,७०० रुपये प्रति किलोवर आली.
यावर्षीच्या धनत्रयोदशीच्या काळात जळगावच्या सराफ बाजारात, गेल्या वर्षीच्या तुलनेत सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी धनत्रयोदशीला सोन्याचा प्रति तोळा दर विनाजीएसटी ६०,५०० रुपये होता, तर चांदीचा दर ७१,२०० रुपये प्रति किलो होता. यंदा सोने दरात १८,७०० रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदी दरात २५,५०० रुपयांची वाढ झाली आहे.
या वाढत्या किमतींचा विचार करता, ग्राहकांनी सोने-चांदी खरेदी करताना त्यांच्या बजेटचा विचार करणे आवश्यक आहे.