नमस्कार सोन्याच्या दरातील सततच्या घसरतीमुळे नागरिकांना आनंदाची बातमी मिळाली आहे. मागील 24 तासांमध्ये सोन्याच्या दरात जवळपास 1,350 रुपयांची घट झाली आहे, तर गेल्या दहा दिवसांत एकूण 9 हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, विशेषता लग्नसराईच्या काळात ही घट त्यांच्या फायद्याची ठरत आहे.
सोन्याचे दर दीड महिन्यातील सर्वात निच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. याचबरोबर चांदीच्या दरातही घट झाली आहे. सलग पाच दिवस सोन्याच्या किमती कमी होत आहेत, ज्यामुळे ग्राहकांसाठी सोने खरेदीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. परिणामी सराफ दुकानांमध्ये गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे.
दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 73,430 रुपयांवर आला आहे, तर मुंबईत तो 77,280 रुपयांवर आहे. इतर शहरांमध्येही दरांची स्थिती जवळपास सारखीच आहे. दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेटची किंमत 77,430 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 70,840 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 77,280 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबई आणि कोलकात्तामध्येही हेच दर आहेत.
जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा योग्य वेळ ठरू शकतो. भविष्यात सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता असल्यामुळे महागाईच्या फटक्यापूर्वी खरेदी करून तुमच्या पैशांची बचत करण्याची संधी आहे.