मंडळी जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजारात जाण्यापूर्वी आजच्या सोन्याच्या नवीन किमतींबद्दल माहिती घेणं योग्य ठरेल. आज आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात एक कमी झालेली आहे. सोमवारी सोन्याचा दर 600 रुपयांनी घसरला असून, चांदीचे दर 1,000 रुपयांनी कमी झाले आहेत. नवीन दरानुसार सोन्याचा दर 78,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे, तर चांदीचा दर 93,000 रुपये प्रति किलो आहे.
नवीन सोन्याचे दर
सोमवारी सराफ बाजाराने जाहीर केलेले नवीन दर पुढीलप्रमाणे आहेत.
- 22 कॅरेट सोन्याची किंमत 72,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- 18 कॅरेट सोन्याची किंमत 59,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- एक किलो चांदीची किंमत 93,000 रुपये आहे.
सोन्याचे दर विविध शहरांमध्ये
- 18 कॅरेट सोन्याचा दर
- दिल्ली: 59,650 रुपये प्रति 10 ग्रॅम
- मुंबई आणि कोलकत्ता: 59,070 रुपये प्रति 10 ग्रॅम
- इंदूर आणि भोपाळ: 59,120 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 22 कॅरेट सोन्याचा दर
- भोपाळ आणि इंदूर: 72,250 रुपये प्रति 10 ग्रॅम
- जयपूर, लखनऊ, दिल्ली: 72,350 रुपये प्रति 10 ग्रॅम
- हैदराबाद, केरळ, कोलकत्ता, मुंबई: 72,220 रुपये प्रति 10 ग्रॅम
सोन्याच्या दरातील चढ-उतार बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून असतो, त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी स्थानिक बाजारातील स्थिती आणि दर तपासणे महत्त्वाचे आहे.