अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक, फेड रिझर्व्हची बैठक होणार आहे, ज्यात व्याजदर कपातीवर निर्णय घेतला जाऊ शकतो. तज्ञांच्या मते व्याज दरात कपात होण्याची मोठी शक्यता आहे, कारण फेड रिझर्व्ह अमेरिकेला महागाईतून बाहेर काढण्यासाठी व्याज दर कमी करू शकतो. या व्याज दर कपातीचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर होईल.
गेल्या दीड महिन्यात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे, आणि सध्या त्यात चढ-उतार सुरू आहे. फेड रिझर्व्हच्या बैठकाआधी, म्हणजे मंगळवारी सोन्याच्या किंमती स्थिर होत्या. MCXवर, दुपारी २.३० वाजता १० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत ८६ रुपयांची घसरण होऊन, ती ७६,९७५ रुपये होती. त्याआधी किंमतीत थोडी वाढ दिसली होती.
फेड रिझर्व्ह व्याजदरात कपात करणार हे जवळपास निश्चित आहे. जर व्याजदर कमी झाले, तर सोन्याच्या किंमती वाढू शकतात. याचे कारण म्हणजे, व्याजदर कमी झाल्यानंतर गुंतवणूकदार शेअर बाजार, सरकारी बाँड्स आणि इतर योजनेत पैसे गुंतवण्याचे टाळतात, कारण त्यावर जास्त व्याज मिळत नाही. दुसऱ्या बाजूला, गुंतवणूकदार सोन्यात अधिक पैसे गुंतवण्यास प्रवृत्त होतात, ज्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होते आणि त्याचा थेट परिणाम किंमतीवर होतो.
सूत्रांच्या माहितीनुसार फेड रिझर्व्हकडून व्याजदर कपात आणि चीनकडून सोन्याची खरेदी लक्षात घेतल्यास, सध्या सोन्याची किंमत ७७,००० रुपये दरम्यान राहू शकते. डिसेंबर अखेरीस, किंमत ८०,००० रुपये होऊ शकते, आणि पुढील वर्षी जुलैपर्यंत ती ९०,००० रुपयेपर्यंत पोहोचू शकते. एका वर्षाच्या दृष्टिकोनातून, डिसेंबर २०२५ पर्यंत सोन्याची किंमत १ लाख रुपये होऊ शकते. यावर्षी सोन्याने २१ टक्के रिटर्न दिला आहे.