लग्नासाठी खूपच जास्त पैसा खर्च होत असतो आणि बऱ्याच वेळेस आयुष्यातील मोठी जमापुंजी लग्नासाठी खर्च होत असते आणि लग्नाचा हा खर्च लक्षात घेऊन सरकार मार्फत कन्यादान योजना राबविण्यात येत आहे ज्यामध्ये काही राशी अनुदानाच्या स्वरूपात सरकारच्या वतीने देण्यात येईल.
कन्यादान योजना ही मुख्यता अनुसूचित जातीच्या मुलींसाठी राबवण्यात येत आहे आणि या योजनेमध्ये विविध स्वयंसेवी संस्थांना सामूहिक विवाह आयोजित करत असताना प्रोस्ताहन देण्यात येते. गरीब कुटुंबांवरती लग्नाच्या खर्चाचा बोजा जास्त पडू नये हेच कन्यादान योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
ऑक्टोबरपासून या नागरिकांना मिळेल मोफत गॅस सिलिंडर, पहा कोण आहे लाभार्थी
कन्यादान योजनेअंतर्गत दाम्पत्याला वीस हजार रुपये दिले जातात तसेच हे पैसे मुलीचे आई-वडील लग्न करण्यासाठी वापरू शकतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ज्या संस्थेमार्फत सामूहिक विवाह केला गेला आहे अशा संस्थेला चार हजार रुपयांची मदत केली जाते. कन्यादान योजनेमध्ये भाग घ्यायचा असेल तर संबंधित व्यक्तीला सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह करावा लागतो.
कन्यादान योजनेसाठी विविध अटी आणि शर्ती लागू करण्यात आलेल्या आहे त्यामध्ये पहिली अट आहे की वधू किंवा वर यांपैकी कमीत कमी एक व्यक्ती अनुसूचित जातीचा असावा. सदर वधू वर हे महाराष्ट्राचे नागरिक असावेत आणि वधूचे वय हे कमीत कमी 18 वर्षे आणि वराचे वय हे कमीत कमी 21 वर्षे असावे.
या योजनेत ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शासनाकडून मिळेल ९०% अनुदान, असा करा अर्ज
कन्यादान योजनेमधील अनुदान हे वधू-वराच्या फक्त पहिल्याच विवाह साठी प्रदान केले जाते आणि त्यांना बालविवाह प्रतिबंध कायदा तसेच हुंडा प्रतिबंध कायद्याचे पालन केले असल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. तसेच सदर वधू-वराचा जात प्रमाणपत्र दाखला दाखवावा लागू शकतो. महाराष्ट्र राज्यात ज्या अनुसूचित जातीच्या कुटुंबांना विवाहाचा खर्च पेलावणार नाही असे व्यक्ती या कन्यादान योजनेचा लाभ घेऊ शकतात.