मंडळी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमधून घरकुल योजना राबवली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे पक्के घर मिळवून देणे हा आहे. यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. 2025 साठी या योजनेच्या अटी, आवश्यक कागदपत्रे आणि अनुदानाची माहिती खाली दिली आहे.
घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- ग्रामपंचायत रहिवासी प्रमाणपत्र
- जॉब कार्ड
- बँक पासबुक
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पासपोर्ट साइज फोटो
गरज पडल्यास अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार काही अतिरिक्त कागदपत्रांची मागणी होऊ शकते.
घरकुल योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान (2025)
2025 मध्ये ₹1,20,000 (एक लाख वीस हजार रुपये) अनुदान मंजूर करण्यात आले आहे. राज्य सरकारने हे अनुदान वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव दिला आहे, मात्र अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.
घरकुल लाभार्थी यादी ऑनलाइन कशी पहावी?
1) अधिकृत वेबसाइटला भेट द्या –https://rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx
2) राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत निवडा.
3)ज्या वर्षाची यादी पाहायची आहे ते वर्ष निवडा.
4) अर्ज केलेली योजना निवडा.
5) दिलेला कॅप्चा कोड टाका आणि सबमिट.करा.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर घरकुल लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल.
घरकुल योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी घर बांधणीसाठी मदत करणारी महत्त्वाची योजना आहे. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा.