नमस्कार व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 16.50 रुपयांची वाढ केली आहे. हा सिलिंडर प्रामुख्याने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, आणि मोठ्या समारंभांमध्ये वापरला जातो, त्यामुळे या वाढीचा थेट परिणाम खाद्यपदार्थांच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे.
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात बदल नाही
घरगुती गॅस सिलिंडरच्या (14.2 किलो) किंमती मात्र पूर्वीप्रमाणेच आहेत. देशातील मोठ्या शहरांतील घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती खालीलप्रमाणे आहेत.
- दिल्ली: ₹803
- कोलकाता: ₹829
- मुंबई: ₹802.50
- चेन्नई: ₹818.50
व्यावसायिक सिलिंडरच्या किमती
व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता प्रमुख शहरांमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
- दिल्ली: ₹1818.50
- कोलकाता: ₹1927.00
- मुंबई: ₹1771.00
- चेन्नई: ₹1980.50
सलग पाचव्या महिन्यात दरवाढ
नोव्हेंबर महिन्यातही या सिलिंडरच्या किमतीत 62 रुपयांची वाढ करण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात 48.50 रुपये, सप्टेंबरमध्ये 39 रुपये, तर ऑगस्टमध्ये 6.50 रुपयांची वाढ झाली होती. सलग पाचव्या महिन्यातील या दरवाढीमुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
उज्ज्वला योजनेतील लाभ
पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी 12 गॅस सिलिंडरपर्यंत ₹300 ची सबसिडी दिली जाते. सबसिडीमुळे किमान स्तरावरील ग्राहकांना दिलासा मिळत आहे, परंतु वाढत्या दरांमुळे आर्थिक भार वाढत असल्याचे जाणवते.
महागाईच्या या लाटेने सर्वसामान्य नागरिक आणि व्यवसायिक यांच्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. गॅस दरवाढीचा परिणाम खाद्यपदार्थांच्या किंमतींवर दिसून येईल, ज्यामुळे ग्राहकांना अधिक खर्च करावा लागू शकतो.