मित्रांनो नववर्षाच्या पहिल्या दिवशी गॅस ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत घट करण्यात आली असून, गेल्या पाच महिन्यांपासून होत असलेल्या वाढीला या घटीनंतर थोडा विराम मिळाला आहे.
सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. त्यानुसार, 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 14.50 रुपयांची घट झाली आहे. 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या आठ महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किमती स्थिर असून जळगावात तो 808 रुपयांना उपलब्ध आहे.
देशभरातील किंमती
- दिल्ली — 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 1818.50 रुपयांवरून 1804 रुपयांना मिळेल.
- मुंबई — किंमत 1771 रुपयांवरून 1756 रुपयांवर आली आहे.
- कोलकाता — येथे 1911 रुपयांवर किंमत स्थिर आहे, पूर्वीपेक्षा 16 रुपयांची घट.
- चेन्नई — 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 1966 रुपये आहे.
घरगुती गॅस दर कायम
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नसून ग्राहकांना अद्याप 14 किलोच्या सिलिंडरसाठी आधीचेच दर भरावे लागतील.
नववर्षाच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीतील घट उद्योग व्यवसायांसाठी सुखद ठरणार असली तरी घरगुती ग्राहकांसाठी मोठा दिलासा मिळालेला नाही.