मंडळी नवीन वर्षात गॅस सिलेंडरच्या किमतीत महत्त्वपूर्ण बदल घडला आहे. देशात जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत दिलासा मिळाल्यानंतर आता व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीतही घट दिसून आली आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस कंपन्या त्यांच्या किमतीत बदल करत असतात. यंदाच्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमतीत कशी घसरण झाली आहे, यावर एक नजर टाकूयात.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती
14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत एप्रिल महिन्यापासून स्थिर राहिली आहे. मोदी सरकारच्या काळात 400 रुपयांनी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली होती, ज्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर मार्च 2024 मध्ये घरगुती गॅसच्या किमतीत कपात केली गेली. त्यानंतर 1100 रुपयांहून गॅस दर खाली आले. सध्या दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 803 रुपये आहे, तर कोलकत्त्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईत 818.50 रुपये आहे. उज्ज्वला योजना ग्राहकांना सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी मिळते.
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत घसरण
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत जुलै महिन्यापासून सातत्याने वाढ झाली होती. पण आता यामध्ये मोठी घसरण झाली आहे. दिल्लीत 14.5 रुपयांची घसरण झाल्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1,804 रुपये झाली आहे. कोलकत्त्यात 16 रुपयांची घसरण झाली असून, आता किंमत 1,911 रुपये आहे. मुंबईत 15 रुपयांची घसरण झाली आहे, त्यामुळे किंमत 1,756 रुपये झाली आहे. चेन्नईत 14.5 रुपयांची घसरण झाली असून, येथे व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1,966 रुपये आहे.
मागील पाच महिन्यात सिलेंडरच्या किमतीत वाढ
गेल्या पाच महिन्यांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत सातत्याने वाढ झाली. जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत, दिल्लीतील किमती 172.5 रुपयांनी वाढल्या, तर कोलकत्त्यात 171 रुपये आणि चेन्नईत 171 रुपयांनी दरवाढ झाली. डिसेंबर महिन्यात सलग पाचव्या महिन्यात दरवाढ झाली होती. 19 किलो एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 16.50 रुपयांची वाढ झाली होती, ज्यामुळे प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिकांना जादा किंमत मोजावी लागली.
याआधीच्या दरवाढीच्या तुलनेत, नवीन वर्षाच्या सुरूवातीला या किमतीत झालेली घसरण ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी ठरली आहे.