नमस्कार मित्रांनो जर तुम्ही घरगुती गॅसचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर वापराबाबत काही नवीन नियम जाहीर केले आहेत. या नियमांनुसार एका वर्षामध्ये तुम्हाला मर्यादित गॅस सिलेंडर उपलब्ध होतील. चला या नियमांची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
नियम काय आहेत?
1) एका गॅस कनेक्शनवर एका वर्षात केवळ 12 गॅस सिलेंडर मिळतील. याशिवाय अतिरिक्त 3 सिलेंडर म्हणजेच एकूण 15 गॅस सिलेंडर उपलब्ध असतील.
पण पहिल्या 12 सिलेंडरवर सबसिडी मिळेल, पण उर्वरित 3 सिलेंडरवर सबसिडी दिली जाणार नाही.
2) एका वर्षात तुम्हाला 213 किलो LPG गॅस वापरण्याची मुभा असेल. याचा अर्थ एका सिलेंडरचे वजन 14.2 किलो धरल्यास, एकूण 15 सिलेंडरपुरता गॅस मिळेल.
अतिरिक्त गॅसची गरज भासल्यास काय करावे?
जर कुटुंबाला 15 सिलेंडरपेक्षा जास्त गॅस सिलेंडरची आवश्यकता असेल, तर त्या कुटुंबाला स्वतंत्र नवीन कनेक्शन घ्यावे लागेल. विशेषता ज्या घरांमध्ये मोठे कुटुंब आहे किंवा लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांसाठी गॅसचा जास्त वापर होतो, त्यांना हे नियम लागू होणार आहेत.
नवीन कनेक्शनसाठी नियम
- जास्त गॅस सिलेंडरची गरज भासल्यास, दुसरे कनेक्शन घ्यावे लागेल.
- नवीन कनेक्शनसाठी अतिरिक्त कागदपत्रे आणि खर्च आवश्यक असतील.
सरकारच्या योजनेचा प्रभाव
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गोरगरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळाल्यामुळे देशभरात गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषता ग्रामीण भागातील महिलांना चुलीपासून मुक्ती मिळाली आहे. या नवीन नियमांमुळे काही कुटुंबांना नियोजन करून गॅस वापरावा लागणार आहे.
नवीन नियमांमुळे काय बदल होतील?
हे नियम लागू झाल्यानंतर मोठ्या कुटुंबांना किंवा नियमित गॅस वापर करणाऱ्या कुटुंबांना गॅस खरेदी करताना अधिक खर्च करावा लागू शकतो. यासाठी गॅसचा योग्य वापर करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सूचना — या नियमांबाबत अधिकृत माहिती तुमच्या गॅस वितरण करणाऱ्या कंपनीकडून किंवा अधिकृत पोर्टलवरून मिळवा.