नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन आणि लाभदायक योजना घेऊन आलो आहे गाय गोठा योजना 2024. या योजनेबद्दल सविस्तर आणि अचूक माहिती देणार आहे, जी तुम्हाला 100% लाभ मिळवून देईल. या योजनेअंतर्गत गाय गोठा उभारणीसाठी 77,500 रुपये इतके अनुदान मिळू शकते. अर्ज प्रक्रिया आणि पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत.
योजनेची उद्दिष्टे
1) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे.
2) दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वच्छ व सुरक्षित गोठा उभारणे.
3) जनावरांचे ऊन, पाऊस आणि वाऱ्यापासून संरक्षण.
4) शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
- पशुपालन व्यवसायातून आर्थिक उत्पन्न वाढविणे.
- दूध व्यवसायात शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे.
पात्रता
1) अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
2) लाभार्थीकडे गोठा बांधण्यासाठी स्वतःची जमीन असावी.
3) एक कुटुंबाला एकदाच योजनेचा लाभ घेता येईल.
4) लाभार्थी ग्रामीण भागातील शेतकरी असावा.
5) याआधी शासनाच्या कोणत्याही योजनेतून गोठा बांधला नसेल.
6) आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकरी व पशुपालकांना प्राधान्य.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रेशन कार्ड
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक
- मोबाइल नंबर
- ग्रामपंचायत शिफारस पत्र
- जागेचा ७/१२ उतारा
- पशुधन प्रमाणपत्र
- नरेगा जॉब कार्ड (रोहयो)
- गोठा बांधणीचे अंदाजपत्रक अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्यासाठी गावातील ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याकडे अर्ज सादर करावा.