नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण एक नवीन माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या या लेखामध्ये आपण बघणार आहोत की गाय गोठा बांधण्यासाठी किती अनुदान हे मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेऊया या योजनेसाठी फॉर्म कुठे व कसा भरायचा याचीही माहिती आज तुम्हाला मी देणार आहे.
राज्यातील जनतेसाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत शेळी पालन , कुकूटपालन , पक्षी, गाय ,म्हैस पालनासाठी शेड बांधण्यासाठी अनुदान दिले जात असते. 3 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये ही योजना राबवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
तर शेतकरी मित्रांनो याआधी आपण जाणून घेऊया या योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण बघूया , कुक्कुटपालन , शेळी पालन योजने संबंधित माहिती व अर्ज प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत.
गाय तसेच म्हैस यांच्या करिता पक्का गोठा बांधकाम करण्यासाठी दोन ते सहा गुरांसाठी गोठा बांधण्याकरिता 77 हजार 188 रुपये इतके अनुदान दिले जाते. सहा पेक्षा अधिक गुरांसाठी म्हणजेच बारा गुरांचा गोठा बांधण्याकरिता शेतकरी वर्गाला तिप्पट अनुदान देण्यात येत आहे.
गाय गोठा योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला संबंधित एक अर्ज दिला जातो तो अर्ज तुम्हाला पंचायत समितीमध्ये दाखल करावा लागतो.
त्यानंतर अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जातो. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या लेखामध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर आजच ही पोस्ट शेअर करा.