या नागरिकांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार, पहा कोण आहे पात्र

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
Free treatment up to 5 lakhs

केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारने आयुष्यमान भारत ही योजना नुकतीच सुरू करण्यात आली आहे, या योजनेच्या माध्यमा अंतर्गत रुग्णांना पाच लाख रुपयां पर्यंतचे मोफत उपचार मिळत असतात.

या योजनेमध्ये लाभार्थी व्यक्तीला ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळत असतो. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी व्यक्तीला आयुष्मान कार्ड दाखवावे लागेल. लाभार्थी व्यक्तीकडे आयुष्मान कार्ड असले पाहिजे. हे कार्ड दाखवल्यानंतरच लाभार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जातो.

या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयाची माहिती कशी मिळवायची, असा प्रश्न अनेक लाभार्थ्यांना पडलेला असेल , आयुष्मान योजनेमध्ये देण्यात आलेली रुग्णालय तपासणे अगदी सोपे आहे.

पहिल्यांदा आयुष्मान भारत योजनेच्या ऑफिशियल वेबसाइटवर जा (pmjay.gov.in). यानंतर ‘फाइंड हॉस्पिटल’ हा पर्याय निवडावा.

आता तुमचे राज्य, जिल्हा व रुग्णालय (सरकारी किंवा खासगी) इत्यादी माहिती भरा. यानंतर तुम्हाला कोणता आजार निवडायचा आहे ज्यावर तुम्हाला उपचार करायचे आहेत तो निवडा.

आता पॅनेलमेंट प्रकारामध्ये PMJAY निवडा. स्क्रीनवर दर्शविलेला कॅप्चा कोड भरा व सर्च बटनावर क्लिक करा. आयुष्मान योजनेमध्ये दिलेल्या रुग्णालयांची यादी स्क्रीनवर दाखवण्यात आलेली असेल. लिस्टमध्ये आजारांची यादीही दिलेली राहते.

आयुष्मान कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोईची आहे. त्यासाठी तुम्ही ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आयुष्मान भारत योजनेच्या वेबसाइटवर भेट द्यावी लागेल.

ऑफलाइन अर्ज करण्यासाठी, लाभार्थी व्यक्तीला राज्य किंवा जिल्ह्यातील रुग्णालय किंवा आरोग्य केंद्राशी संपर्क करावा लागेल

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.