मोहोळ येथे जनसंवाद यात्रा सुरू आहे आणि या यात्रादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोफत तीन गॅस सिलेंडर देण्याची घोषणा केलेली आहे तसेच त्यांनी महिलांना यापुढे चुलीच्या धुरात स्वयंपाक करण्याची गरज पडणार नाही असे असे आश्वासन दिलेले आहे.
सध्याच्या सरकारच्या माध्यमातून अत्यंत पारदर्शक व्यवहार सुरू आहे आणि त्यामुळे भ्रष्टाचार होण्यास कोणतीही शक्यता नाही असेही अजित पवार यांनी नमूद केले. मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी भाष्य करताना सांगितले की मुलींच्या मोफत शिक्षणासाठी दीड हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि हा सर्व निधी शासनाच्या माध्यमातून देण्यात येईल.
लाडकी बहीण योजनेचे रु.४५०० या दिवशी जमा होणार, पहा कोणती तारीख आहे
महाराष्ट्र राज्याचे स्थूल उत्पन्न 42 लाख कोटी आहे आणि त्यामधील साडेसहा लाख कोटींचा यावर्षीचा अर्थसंकल्प करण्यात आलेला आहे तसेच संपूर्ण देशातील एकूण 18% जीएसटी एकटा महाराष्ट्र भरत असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्यात जमा होणाऱ्या निधीमधून राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत.
सध्याच्या सरकारला बहीण आणि भाऊ दोन्ही लाडके आहेत आणि वारकरी, मुस्लिम, मातंग, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना सुरू आहेत त्याचप्रमाणे विविध बोर्ड आणि कॉर्पोरेशन साठी निधी उपलब्ध केल्याची त्यांनी माहिती दिली. मुस्लिम समाजाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की लोकसभेला त्यांनी पाठ फिरवली तरीपण त्यांच्यासाठी 1000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर , शेतकऱ्याच्या खात्यात या दिवशी रु.५०००० अनुदान होणार जमा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध योजनांची माहिती सांगितली आणि सदर माहिती सांगत असताना त्यांनी विरोधकांवर टोला लगावला. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासनामार्फत सुरू असलेल्या सोलार योजनेची माहिती दिली आणि पुढील काही काळात जास्तीत जास्त कृषी पंपांना सोलर युक्त करण्याचे सरकारचे धोरण असल्याचे स्पष्ट केले.