मंडळी महाराष्ट्रातील महिलांना 1 ऑक्टोबरपासून एक आनंदाची बातमी मिळणार आहे. राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत महिलांना तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा मिळणार आहे.
300 रुपयांची सबसिडी आणि मोफत गॅस सिलिंडर
पूर्वी महिलांना 300 रुपयांची सबसिडी दिली जात होती, ज्यामुळे सामान्य गॅस सिलिंडर सुमारे 503 रुपयांमध्ये मिळत होता. आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षभरात तीन गॅस सिलिंडर पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. ही योजना रक्षाबंधनच्या निमित्ताने जाहीर करण्यात आली होती आणि ती 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.
या योजनेत ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शासनाकडून मिळेल ९०% अनुदान, असा करा अर्ज
माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ
महाराष्ट्रातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना एक वरदान ठरली आहे. या योजनेद्वारे महिलांना दरवर्षी 1500 रुपये दिले जातात, ज्यामुळे त्यांना आर्थिक सक्षमीकरण मिळते. या योजनेतून महिलांना मोफत गॅस सिलिंडरचा लाभ देखील मिळणार आहे.
महिला सक्षमीकरणाचे महत्त्वपूर्ण पाऊल
महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. गॅस सिलिंडरवरील अनुदानामुळे महिलांना घरगुती खर्च कमी होऊन आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत होईल. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि सामाजिक स्थैर्य प्रदान करणे आहे.
लाडकी बहीण योजना : पैसे जमा होण्याची तारीख फिक्स , या तारखेला होणार पैसे जमा Ladki Bahin Yojna
पीएम उज्ज्वला योजनेचा लाभ
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ फक्त त्या महिलांना मिळणार आहे, ज्यांचे नाव ‘पीएम उज्ज्वला योजने’शी जोडलेले आहे. त्यामुळे महिलांनी आपले नाव या योजनेत असल्याची खात्री करून घ्यावी, जेणेकरून त्यांना या सुविधांचा लाभ घेता येईल.
योजनेची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून
राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने योजनेची अधिसूचना जारी केली असून, 1 ऑक्टोबरपासून महिलांना मोफत गॅस सिलिंडर मिळण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पण योजनेचा लाभ फक्त विशिष्ट लाभार्थ्यांना मिळणार आहे, ज्यांचे नाव शिधापत्रिकेत नोंदलेले आहे.
गॅस सिलिंडरची किमतीतील बचत
सध्या बाजारात 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत सुमारे 803 रुपये आहे, ज्यामुळे अनेक गरीब महिलांना गॅस सिलिंडर खरेदी करणे कठीण झाले आहे. पण या योजनेद्वारे मोफत गॅस सिलिंडर मिळाल्यामुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
एसटी महामंडळचा मोठा निर्णय : या नागरिकांना आजपासून मोफत एसटी प्रवास
शिधापत्रिका आणि गॅस कनेक्शन आवश्यक
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावावर शिधापत्रिका आणि गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे. नवीन शिधापत्रिका घेणाऱ्या महिलांना मात्र योजनेचा लाभ मिळणार नाही. अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे, ज्यामुळे महिलांना गॅस सिलिंडरच्या खर्चात मोठा दिलासा मिळेल.
महिला सक्षमीकरणाला गती
राज्य सरकारच्या या योजनेमुळे महिलांना आर्थिक सक्षमीकरणासह घरगुती खर्चातही बचत होणार आहे. योजनेमुळे महिलांचे जीवनमान उंचावेल आणि त्यांचे आर्थिक स्थिरता वाढेल. मंडळी हा लेख इतर मित्रांपर्यंत नक्की पाठवा.