मंडळी राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्य सरकारतर्फे मोफत गॅस सिलेंडर मिळवायचा असेल, तर काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. योग्य प्रक्रिया पूर्ण केल्यासच हा लाभ मिळेल.
राज्यात लोककल्याणकारी योजना म्हणून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला गेला आहे, ज्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तथापि, या योजनेचा लाभ फक्त प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत सामील लाभार्थ्यांना मिळेल. या लाभार्थ्यांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर देण्यात येतील, आणि प्रत्येक सिलेंडरसाठी 830 रुपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.
पण लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे, ज्यांची KYC प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावी, अन्यथा मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार नाही.
महिलांच्या हितासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना
महिलांना आर्थिक सवलत देण्यासाठी राज्य सरकारने विविध लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाकाठी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळतील. यासाठी लाभार्थ्यांनी पहिल्यांदा गॅस सिलेंडर स्वखर्चाने खरेदी करावा लागेल, त्यानंतर सरकारकडून अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.