मंडळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिना दर ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी मोफत वीज बिल योजना सुरू केली आहे. या योजनेला महावितरणच्या भांडुप परिमंडळात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या, घरगुती ग्राहकांच्या घरांच्या छतावर सौरऊर्जा पॅनेल्स बसवून वीज निर्मिती केली जात आहे.
सौरऊर्जा पॅनेल्स — खर्च आणि लाभ
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत, घराच्या छतावर सौरऊर्जा पॅनेल्स बसवून वीज तयार केली जाते. या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे, घरगुती वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाल्यास ग्राहकांचे वीज बिल शून्य होते. तसेच, अतिरिक्त वीज महावितरणच्या जाळ्यात पाठवून ग्राहकांना उत्पन्न मिळवता येते. यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते.
अनुदान कसे मिळवावे?
सौर पॅनेल्स बसवण्यासाठी ग्राहकांना सरकारकडून अनुदान मिळते, हे अनुदान ग्राहकाच्या गरजेवर आधारित असते. अनुदानाची रक्कम खालीलप्रमाणे आहे:
- १ किलोवॅट साठी: ३०,००० रुपये
- २ किलोवॅट साठी: ६०,००० रुपये
- ३ किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त साठी: कमाल ७८,००० रुपये
तसेच घरगुती ग्राहकांसाठी बँकांकडून सवलतीच्या दरात कर्ज घेण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
घरगुती ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर योजना
या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना जवळपास मोफत वीज मिळत आहे. घरगुती ग्राहक आणि निवासी संकुलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असा महावितरणने सुचवला आहे. यामुळे ग्राहकांचा खर्च कमी होईल आणि पर्यावरणाचे संरक्षण देखील होईल.