महाराष्ट्र राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबवण्यात येत आहे आणि याच योजनांमध्ये एक योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षापर्यंत कृषी पंपांसाठी लाईट देण्यात येणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे परंतु आता महावितरणाने यामध्ये नवीन अट सुरू केली आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना महाराष्ट्रात अत्यंत धुमधडाक्यात सुरू झाली. या योजनेअंतर्गत 7.5 एचपी पर्यंतच्या कृषी पंपांसाठी मोफत वीज पुरवठा करण्यात येणार आहे. परंतु आता महावितरणाने ज्या शेतकऱ्यांचे एप्रिल 2024 पूर्वीचे कृषी पंपाचे लाईट बिल थकीत आहे अशा शेतकऱ्यांना ते लाईट बिल भरावीच लागेल असे निर्देश दिलेले आहेत. म्हणजेच एप्रिल 2024 पूर्वीचे कृषी पंप लाईट बिल माफ होणार नाहीत.
सोयाबीनला मिळाला ५ हजार ५५५ रुपये भाव, पहा तुमच्या जिल्ह्याचा दर
महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 860 कोटींपेक्षा जास्त रुपयांचे वीज बिल थकीत आहे. महाराष्ट्र राज्याच्या लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो आणि राज्यातील शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर जुलै 2024 मध्ये याला मान्यता मिळाली.
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यापासून मोफत वीजपुरवठा या योजनेमार्फत देण्यात येत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना वीज पुरवठ्यामुळे शेतीमध्ये कोणतेही नुकसान होऊ नये आणि त्यांचे उत्पन्न वाढावे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
या योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिकांना मिळेल ३ हजार रुपये, असा करा अर्ज
मुख्यमंत्री बळीराजाच्या मोफत वीज योजना मार्च 2029 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे आणि त्यासाठी आता प्रशासनाच्या माध्यमातून अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. शासनाच्या या निर्णयाचे राज्यातील शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे.