मुलींना शाळेत येणे जाणे करण्यासाठी सरकार मोफत सायकल वितरण करीत आहे. मुलींना सक्षम करण्यासाठी सरकार वारंवार निर्णय घेत असतात. इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना लेडीज सायकल करिता अर्थसहाय्य देण्यात येतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे घर हे शाळेपासून 2 किलोमीटर अंतरावर असणे आवश्यक आहे. जर एक कुटुंबात एक पेक्षा जास्त मुली असेल तर एकाच मुलीला हा लाभ घेता येतात. या योजनेसाठी सुरुवातीला अर्जदारालाच सायकल विकत घ्यावी लागेल आणि नंतर तुम्हाला हा फॉर्म भरून अर्थसहाय्य मिळेल.
पात्रता :
- अर्जदार ही दारिद्र्य रेषेखालील असावी.
- अर्जदारच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 रुपयापेक्षा कमी असावे.
- ती विद्यार्थिनी इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेत असावी.
कागदपत्रे :
- आधार कार्ड
- उत्पनाचा दाखला
- बँक पासबुक
- सायकल घेतलेले बिल
अर्ज कसा करावा :
अर्जदाराला अर्ज करण्यासाठी जिल्हा परिषद मधून फॉर्म आणावा लागेल आणि तो भरून पंचायत समिती मध्ये सादर करावा.
(टीप : ही योजना फक्त काही ठिकाणीच सुरु आहे, कृपया तुम्ही तुमच्या जवळील जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती मध्ये जाऊन विचारपूस करून घ्यावे.)