मंडळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उल्लास नवभारत साक्षरता या कार्यक्रमांतर्गत, निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त ५ गुण देण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालनालयाने शिक्षण मंडळाकडे पाठवला आहे.
गुण मिळवण्याची प्रक्रिया कशी असेल?
सध्या बोर्डाकडून विद्यार्थ्यांना कला, चित्रकला, क्रीडा स्पर्धा आणि इतर क्षेत्रांमध्ये विशेष गुण दिले जातात. आता त्यामध्ये साक्षरता अभियानातील सहभागाचाही समावेश केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी किमान पाच निरक्षर व्यक्तींना साक्षर केल्यास त्यांना हे ५ गुण मिळू शकतात. हा उपक्रम इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. प्रत्येक स्वयंसेवक विद्यार्थी जास्तीत जास्त ५ गुण मिळवू शकतो.
विद्यार्थ्यांना याचा काय फायदा?
- या अतिरिक्त ५ गुणांमुळे एकूण टक्केवारीत वाढ होईल.
- उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवताना मदत होईल.
- डिप्लोमा, ITI, इंजिनिअरिंग, विज्ञान आणि वाणिज्य अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याची संधी वाढेल.
- सामाजिक कार्याचा अनुभव मिळेल आणि समाजसेवेत सहभाग घेण्याची संधी मिळेल.
हा निर्णय विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी शिकवण्यास मदत करेल आणि राज्यातील निरक्षरतेचे प्रमाण कमी करण्यास उपयुक्त ठरेल.