नमस्कार मित्रांनो महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. यामुळे विरोधकांची बोलती बंद झाली असून, आता तेही अशा प्रकारची योजना सुरू करण्याचा विचार करत असल्याचे दिसते. विरोधकांकडून लाडक्या बहिणींचा प्रपंच सावरला, पण लाडका भाऊ उपाशी राहिला अशी टीका केली जात आहे. या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ४४ लाख शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केल्याची माहिती दिली.
विकासकामांचे भूमिपूजन
देवळाली विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार सरोज अहिरे यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात बोलताना पवार यांनी महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या योजनांवर प्रकाश टाकला.
महिला आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय
- लाडकी बहीण योजना: गरीब मुलींना शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून शिक्षण मोफत केले.
- वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय.
- पीकविमा योजना: फक्त एक रुपयात पीकविमा उपलब्ध.
- दुधावर प्रतिलिटर ७ रुपये अनुदान.
- कांद्यावरील निर्यात बंदी हटवून शेतकऱ्यांना दिलासा.
सर्वांसाठी समान न्याय
अजित पवार यांनी सांगितले की, शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित महाराष्ट्राचा विकास साधण्याचे काम सुरू आहे. जातीपातीचे राजकारण न करता आम्ही प्रत्येकाला समान न्याय दिला आहे.
आगामी निवडणुकीत महाराष्ट्राचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे, हे जनतेने ठरवायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.