शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. यापैकी सर्वात महत्वाचे व प्रभावी योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आलेल्या या योजनेने देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवीन आशा तयार केली आहे.
योजनेची संकल्पना व उद्दिष्टे
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारतातील छोट्या व सीमांत शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेली एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे देशातील शेतकऱ्यांना नेहमी आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे. प्रत्येक पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाला वार्षिक 6,000 रुपयांचे अर्थ सहाय्य यामध्ये दिले जाते, हे तीन समान हप्त्यांमध्ये विभागले जाते.
योजनेची कार्यपद्धती
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर Direct Benefit Transfer पद्धतीचा वापर. शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जात असतो. या पद्धतीमुळे मध्यस्थ व्यक्तीची गरज संपुष्टात आली आहे , याशिवाय लाभार्थ्यांपर्यंत संपूर्ण रक्कम पोहोचते.डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळत असल्यामुळे, शेतकरी आधुनिक बँकिंग व्यवस्थेसोबत जोडले गेले आहेत.
योजनेची व्याप्ती व यश
आजपर्यंत या योजनेचा लाभ 11 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचला आहे. भारत सरकारने आतापर्यंत 3.24 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा 18 वा हप्ता दिला होता, लाखो शेतकरी आता 19 व्या हप्त्याची वाट बघत आहेत.
या योजनेमुळे निश्चितच देशातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणले आहेत.