मित्रांनो नमस्कार जर तुम्ही या 6 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यातील शेतकरी असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. उद्यापासून तुमच्या खात्यात 1927 कोटी रुपयांचा पिक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया 10 ऑक्टोबरपासून सुरू करण्याची माहिती दिली आहे.
विशेषत: अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2023 सालच्या थकीत पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, अशी अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.
1927 कोटींचा विमा मंजूर
नाशिक, सोलापूर, सातारा, चंद्रपूर, जळगाव या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना देखील लवकरच या पिक विमाचा लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबर रोजी झालेल्या आंदोलनानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने 1927 कोटी 52 लाख रुपयांच्या विमा रकमेचा जीआर जारी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यास सुरुवात होणार आहे.
प्रलंबित नुकसान भरपाईचे वाटप
नाशिकसाठी 656 कोटी रुपये जळगावसाठी 470 कोटी रुपये, अहमदनगरसाठी 713 कोटी रुपये, सोलापूरसाठी 2.66 कोटी रुपये, साताऱ्यासाठी 27.73 कोटी रुपये, आणि चंद्रपूरसाठी 58.90 कोटी रुपयांची प्रलंबित रक्कम मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, विम्याच्या रूपात आर्थिक आधार मिळणार आहे.