नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्डसाठी नोंदणी केली आहे आणि आता त्यांना युनिक आयडी मंजूर झाल्याचे संदेश मिळू लागले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी फार्मर आयडी कार्ड कसे डाउनलोड करायचे याबाबत उत्सुक आहेत. चला तर मग, संपूर्ण प्रक्रिया सविस्तरपणे जाणून घेऊया.
फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय?
राज्य सरकारने अॅग्रीस्टॅक योजना (Agristack Scheme) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी युनिक फार्मर आयडी कार्ड सुरू केले आहे. या कार्डाच्या माध्यमातून शेतजमिनीची माहिती, पिकांचे उत्पादन, बाजारभाव, डिजिटल माहितीकरण आणि जमीन मालकीसंबंधी सर्व माहिती एकत्रितपणे उपलब्ध होणार आहे. हे कार्ड विविध सरकारी योजना, अनुदान व सवलतींसाठी उपयुक्त ठरणार आहे.
फार्मर आयडी स्टेटस कसा तपासायचा?
1) अधिकृत संकेतस्थळावर जा https://apfr.agristack.gov.in/farmer-registry-ap/#/checkEnrolmentStatus
2) जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल, तर तुमचा आधार क्रमांक टाका आणि Submit बटणावर क्लिक करा.
3) सबमिट केल्यानंतर तुमची नोंदणी माहिती स्क्रीनवर दिसेल.
4) युनिक आयडी स्क्रीनवर दिसेल. सध्या दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध नाही, त्यामुळे नोंदणीवेळी दिलेली माहितीच दाखवली जाते
फार्मर आयडी कार्ड कसे डाउनलोड करावे?
1) आधार क्रमांक टाकून लॉगिन करा.
2) View Details वर क्लिक करा तुमची सर्व माहिती दिसेल.
3) Generate PDF किंवा Download PDF या पर्यायावर क्लिक करून कार्ड डाउनलोड करा.
4) कार्ड सेव्ह करून त्याची प्रिंट घ्या.
फार्मर आयडी कार्ड वितरण कसे होणार?
युनिक फार्मर आयडी कार्डचे अधिकृत वितरण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, हे कार्ड शेतकऱ्यांना पोस्टाने पाठवले जाणार आहे. इच्छुक शेतकरी agristack पोर्टलवरून स्वतःही कार्ड डाउनलोड करू शकतात.
फार्मर आयडी कार्डचे फायदे
- शेतकऱ्यांची सर्व माहिती एका ठिकाणी डिजिटल स्वरूपात उपलब्ध
- सरकारी योजना, अनुदान व कर्जसुविधा मिळवणे अधिक सोपे
- पिकांची माहिती, बाजारभाव, व जमीन मालकीबाबत खात्रीशीर माहिती
- डिजिटल शेती व्यवस्थापनाला चालना