नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवत असते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारने आता शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केले आहे.
१५ एप्रिल २०२५ पासून शेतकरी ओळखपत्र नसल्यास कोणतीही कृषी योजना लागू होणार नाही. त्यामुळे ज्यांनी अद्याप आपले ओळखपत्र तयार केलेले नाही, त्यांनी लवकरात लवकर ते मिळवणे आवश्यक आहे.
शेतकरी ओळखपत्राचे महत्व
राज्य सरकार आणि कृषी विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे. या ओळखपत्राद्वारे शेतकऱ्यांचे सर्व माहिती व शेती पिकांची नोंद AgriStack या ऑनलाईन प्रणालीशी जोडली जाणार आहे. यामुळे योजनांचा लाभ अधिक सुकर आणि पारदर्शकपणे मिळू शकणार आहे.
शेतकरी ओळखपत्र कसे मिळवावे?
- ग्रामस्तरावरील ग्राहक सेवा केंद्रात (CSC) भेट देऊन अर्ज करता येतो.
- ग्राम कृषी विकास समिती किंवा तालुका कृषी कार्यालयात देखील हे ओळखपत्र मिळवता येईल.
- अर्ज करताना शेताची माहिती, आधार कार्ड व आवश्यक कागदपत्रे सोबत घ्यावीत.
महत्त्वाची सूचना
सरकारच्या निर्देशानुसार, १५ एप्रिल २०२५ नंतर शेतकरी ओळखपत्र नसलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.