नमस्कार मित्रांनो शेती करताना शेतकऱ्यांना नेहमीच नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी किंवा वादळं, अशा अनेक संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
यंदा महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. केंद्र सरकारने यासाठी केंद्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत १४ राज्यांना ५८५८ कोटी ६० लाख रुपयांचा अग्रिम निधी वितरित केला आहे.
मदतीच्या योजनांचा लाभ घ्या
शेतकरी सोयाबीन आणि कापूस पिकांसाठी ई-केवायसी करून अनुदानाचा लाभ घेऊ शकतात.
महाराष्ट्राला या निधीतून सर्वाधिक १४९२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, ज्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. अतिवृष्टी किंवा पुरामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या निधीमधून केली जाते.
राज्यनिहाय मदत वाटप
केंद्र शासनाने २१ राज्यांना एकूण १४,९५८ कोटी रुपये वितरित केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रासोबत खालील राज्यांना मदत दिली गेली आहे:
महाराष्ट्र: १४९२ कोटी रुपये
आंध्र प्रदेश: १०३६ कोटी रुपये
आसाम: ७१६ कोटी रुपये
बिहार: ६५५ कोटी ६० लाख रुपये
गुजरात: ६०० कोटी रुपये
तेलंगणा: ४१६ कोटी ८० लाख रुपये
पश्चिम बंगाल: ४६८ कोटी रुपये
पिक विमा आणि नुकसान भरपाई
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पिक विमा कंपनीकडून आर्थिक मदत मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांसाठी विमा उतरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पिक विमा अर्ज शेतकरी स्वता ऑनलाइन करू शकतात, आणि पुर, अतिवृष्टी किंवा दुष्काळ झाल्यास विमा कंपनीकडे नुकसानीची तक्रार करून मदत मिळवू शकतात.