नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण शेतकरी असाल आणि शेतीसोबतच एक चांगला उत्पन्न देणारा व्यवसाय सुरू करू इच्छिता, तर शासनाची एक महत्त्वाची योजना आपल्या मदतीला येते. हि योजना आहे किसान ड्रोन योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कीटकनाशके फवारण्यासाठी ड्रोन खरेदीसाठी अनुदान मिळू शकते. या योजनेतून शेतकऱ्यांना 4 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळवता येते.
किसान ड्रोन योजना काय आहे?
ड्रोन वापरून शेतकऱ्यांना अनेक फायदे होऊ शकतात. शेतकऱ्यांना कीटकनाशके, सूक्ष्म मूलद्रव्ये, खते फवारणी आणि इतर कृषी कामे करण्यासाठी ड्रोनचा वापर करता येतो. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि कर्ज वाचतो. याच कारणामुळे सरकारने कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेत ड्रोनचा समावेश केला आहे. यानुसार, शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
किसान ड्रोन योजना – पात्र लाभार्थी
किसान ड्रोन योजनेचा लाभ घेणारे काही प्रमुख लाभार्थी पुढीलप्रमाणे आहेत
- शेतकरी
- शेतकरी उत्पादक कंपन्या
- शेतकरी सहकारी संस्था
- कृषी व तत्सम पदवीधर
- अनुसूचित जाती-जमाती आणि लहान सीमांतिक महिला शेतकरी
किती अनुदान मिळेल?
ड्रोन खरेदीसाठी मिळणारे अनुदान योजनेत विविध लाभार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रमाणात दिले जाते.
- शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी सहकारी संस्था: 40% अनुदान (4 लाख रुपये पर्यंत)
- कृषी व तत्सम पदवीधर: 50% अनुदान (5 लाख रुपये पर्यंत)
- अनुसूचित जाती-जमाती आणि लहान सीमांतिक महिला शेतकरी: 50% अनुदान (5 लाख रुपये पर्यंत)
- सर्वसाधारण शेतकरी: 40% अनुदान (4 लाख रुपये पर्यंत)
ड्रोन अनुदान अर्ज कसा आणि कुठे करावा?
2024-25 या वर्षासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा महाडीबीटी फार्मर पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जा.
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
तसेच अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल.
किसान ड्रोन योजना शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील कामे अधिक सोप्या आणि कार्यक्षम पद्धतीने करण्याची संधी प्रदान करते. यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवण्यास मदत होईल.