महाराष्ट्र राज्याचं शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात आनंददायी ठरताना दिसत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पाच महत्वाच्या योजनांच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. या योजनांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला किमान ५० ते ६० हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे नवीन वर्षाचा पहिला आठवडा हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष राहणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
या योजनेची सुरुवात राज्य सरकारने २०१७ मध्ये केली होती. त्यावेळी राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना १८,७६२ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आलेली होती.
मात्र, सॉफ्टवेअर मध्ये आलेल्या त्रुटींमुळे ६ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहा लागले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याची घोषणा केलेली आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी महत्वाची ठरणार आहे.
पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना
शेतकऱ्यांवरील पीक कर्जाचा बोजा कमी व्हावा यासाठी ही योजना फायद्याची ठरली आहे. या योजनेअंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज वेळेत परतफेड करत असलेल्या शेतकऱ्यांना ३ टक्के व्याज सवलत इतके अनुदान दिले जाते. चालू वर्षासाठी या योजनेवर ७२ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. या निधीतून शेतकऱ्यांना व्याज सवलतीचा लाभ दिला जाणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
२०१९ मध्ये सुरू केलेल्या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते.
आतापर्यंत १४ लाख ३१ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ५ हजार१९० कोटी रुपये जमा केले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ही योजना शेतकऱ्यांमध्ये नियमित कर्जफेडीची सवय लावण्यास मदत करणार आहे.
पीक विमा योजना
२०२४ च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवला होता. तसेच रब्बी हंगामामध्ये ६६ लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. हा आकडा खूप जास्त असून, यातून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबाबत जागरूकता वाढताना दिसून येत आहे. मागील वर्षी या योजनेसाठी २,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. चालू वर्षी ही रक्कम वाढवून ५,१७४ कोटी रुपये इतकी केली आहे.
या सर्व योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देत आहेत. आर्थिक मदतीचा उपयोग करून शेतकरी आधुनिक शेती पद्धती अवलंबू शकत आहे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू शकणार व त्यांच्या उत्पन्नात वाढ करू शकणार आहेत.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या या पाच योजना शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करणार आहेत. या योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळेल व त्यांचा आत्मविश्वास वाढेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मिळणारी ही भेट राज्यातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंद देणारी ठरेल.