मंडळी अलीकडेच सोशल मीडियावर पीएम मोदी एसी योजना २०२५ नावाचा एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजनुसार, भारत सरकार १.५ कोटी ५-स्टार एअर कंडिशनर्स मोफत वाटप करणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा असून, सरकारने अशा कोणत्याही योजनेची घोषणा केलेली नाही.
पीआयबी फॅक्ट चेकची स्पष्टोक्ती
या दाव्याचे खंडन करताना, पीआयबी फॅक्ट चेक या अधिकृत ट्विटर (एक्स) हँडलने स्पष्टीकरण दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सरकारकडून अशा प्रकारची कोणतीही योजना जाहीर करण्यात आलेली नाही. हा दावा खोटा आहे.
ऊर्जा मंत्रालयानेही मोफत एसी वाटपाची कोणतीही योजना जाहीर केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बनावट मेसेजचा उद्देश काय?
व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या या बनावट मेसेजचा उद्देश लोकांची फसवणूक करणे, त्यांच्या वैयक्तिक माहितीवर डोळा ठेवणे, तसेच बनावट वेबसाईट्सवर ट्रॅफिक वाढवणे हाच असतो.
वापरकर्त्यांनी काय काळजी घ्यावी?
- अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका.
- अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नका.
- वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
- अशा मेसेजची तक्रार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नोंदवा.
- अधिकृत सरकारी संकेतस्थळांवरूनच माहितीची खातरजमा करा.
पीएम मोदी एसी योजना २०२५ नावाने फिरणारा मेसेज हा पूर्णपणे बनावट आहे. नागरिकांनी सतर्क राहून, अशा अफवांपासून दूर राहावे व अधिकृत स्रोतांकडूनच माहितीची पुष्टी करावी.