Electricity bill waived : उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोहोळ दौऱ्यावर गेले असता त्यांनी तिथे शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या. सध्या चर्चेत असलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांना अद्याप हप्ता मिळालेला नसून त्यांना या महिन्यात ४५०० रुपये मिळणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजनेनंतर आता या नागरिकांना मिळेल ३००० रुपये, असा करा अर्ज
भारत हा देश कृषिप्रधान देश आहे, म्हणून शेतकऱ्यांसाठी सुद्धा विविध योजना अमलात आणल्या जातात. पुढील पाच वर्ष शेतीला मोफत वीज देण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसांत वीज बिल माफीचा आदेश काढण्यात येणार आहे. साडेनऊ हजार मेगावॅट विजेची निमिर्ती सौरऊर्जेवर केली जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा : या महिलांना मिळेल वर्षाला मोफत तीन गॅस सिलेंडर
मोहोळ येथील बाजार समितीच्या मैदानावर रविवारी ‘जनसंवाद यात्रा व लाडक्या बहिणींशी संवाद’ हा कार्यक्रम झाला.
अध्यक्षस्थानावरून उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पवार पुढे म्हणाले की, आम्ही जरी महायुतीबरोबर असलो तरी आम्ही सेक्युलर विचारधारा सोडलेली नाही.
वीजबिल माफी यादी जाहीर
शेतकऱ्यांना आता सरसकट वीज माफीचा निर्णय काढणार आहे, यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे.