नमस्कार मंडळी राज्यातील नागरिकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे दररोज वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलाच्या किंमती सतत वाढत आहेत. सध्या आयात शुल्कात वाढ झाल्यामुळे खाद्यतेलाच्या दरांवर परिणाम दिसून येत आहे. चला तर जाणून घेऊया नवीन दर काय आहेत.
सणासुदीतील महागाईचा फटका
राज्यात सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत आणि या पार्श्वभूमीवर नागरिकांना महागाईचा मोठा तडाखा सहन करावा लागत आहे. खाद्यतेलासह, सोने-चांदीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. एक ऑक्टोबरपासून सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांचे आर्थिक ओझे वाढले आहे.
बाजारातील स्थिती
सध्या राज्यात पितृपक्ष सुरू असल्याने बाजारातील ग्राहकांची संख्या कमी आहे, पण वस्तूंचे दर मात्र वाढले आहेत. खोबरे, खोबरे तेल, तसेच सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विशेषता नारळाच्या दरांमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे, कारण नारळाची आवक कर्नाटक, तमिळनाडू, आणि आंध्र प्रदेशातून होत असते. आवक कमी झाल्यामुळे नारळाच्या दरात अचानक वाढ झाली आहे, सध्या बाजारात नारळाचे दर 2500 ते 3000 रुपये प्रति शेकडा इतके पोहोचले आहेत.
खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ
सरकारने आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवल्यामुळे खाद्यतेलाच्या दरांमध्ये 1000 ते 2000 रुपये प्रति क्विंटल वाढ झाली आहे. सध्या पाम तेल, सोयाबीन तेल, सरकी तेल, सूर्यफूल तेल, आणि करडी तेलाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. खाद्यतेलाचे 15 लिटर डब्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत
सूर्यफूल तेल – आधी 1700 रुपये, आता 1970 रुपये
सोयाबीन तेल – आधी 1690 रुपये, आता 1980 रुपये
मित्रानो या महागाईमुळे सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे, आणि आगामी काळात ही परिस्थिती सुधारेल का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.